गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सगळे उत्सुक आहेत...तेव्हा त्यांना सगळ्यात प्रिय (आणि मला सुद्द्धा ) असलेले उकडीचे मोदक कसे करतात ते आपण बघूया...साधारणतः प्रत्येक घराची हे मोदक करायची एक विशिष्ठ पद्धत असते...आणि प्रत्येक घरातली "आई" हि मास्तर शेफ असते...तरीही माझ्यासारखे "शिकाऊ" उमेदवार कोणी असतील तर त्याच्यासाठी ही रेसिपी :
साहित्य : एक वाटी स्वच्छ तांदूळ धुऊन, सावलीत वाळवून, दळून चाळलेली पिठी, एक वाटी (साखर + गूळ), एक नारळ, चार चमचे तूप, वेलची पूड, तेल, आवडत असल्यास भाजून कुटलेली अर्धी वाटी खसखस पूड.
सारण: खोवलेल्या नारळाच्या चवात साखर आणि गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवावे.

